Sindhudurg: भोगवेहून वालावल मार्गे कुडाळ दिशेने येणाऱ्या कुडाळ एसटी आगाराच्या बसला अपघात

2
244
भोगवेहून वालावल मार्गे कुडाळ दिशेने येणाऱ्या कुडाळ एसटी आगाराच्या बसला अपघात
  • बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. चालकासह १२ प्रवाशी किरकोळ जखमी

सिंधुदुर्ग :- कुडाळ एसटी आगाराच्या भोगवे येथून कुडाळला येणाऱ्या एसटी बसला वालावल मार्गावर माऊली मंदिर रस्त्यावरील तीव्रउतारावर आज गुरूवारी सकाळी ११- ५० वाजताच्या सुमारास अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. तरीही चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र बस झाडाला धडकली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मालवणात-अग्नितांडव-दोन/

या अपघातात चालकासह १२ प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. राष्ट्रीवादीचे जिल्हा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत जखमी प्रवाशांना तातडीने वालावल आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

2 COMMENTS

  1. […] कोल्हापूर– कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरवासीयांसह भाविक, पर्यटकांना लवकरच नौकानयनाचा आनंद मिळणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पंचगंगेत बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. त्याद़ृष्टीने प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या रंकाळ्यात पर्यटकांना नौकानयनाची सुविधा उपलब्ध आहे. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-भोगवेहून-वालावल-मार्ग… […]

  2. […] सावंतवाडी – कोल्हापूर येथील रा.शि.गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांच्या ३१ कलाकृतींची निवड ६२ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. उपयोजित कला प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि मूलभूत अभ्यासक्रमांकसोबत गुणवत्ता प्रमाणपत्र चार विद्यार्थ्यांना जाहीर झाले आहे. यात आंबोली येथील शुभम शशिकांत गावडे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-भोगवेहून-वालावल-मार्ग… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here