सिंधुदुर्ग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजना राबविण्यात येते. सदर योजनेसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जर्मनीला-कुशल-मनुष्यबळ/
मागील वर्षाच्या तुलनेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी रजिस्ट्रेशन 68 टक्के दिसून येत आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत 32 टक्के विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत. तरी भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सर्व महाविद्यालयानी आपल्या अनुसूचित जातीच्या पात्र विद्यार्थ्यांचे 6 फेब्रुवारी2023 अखेर महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी करावी असे आवाहन संतोष चिकणे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
कॉलेज स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्यात येतील. तसेच या शिष्यवृत्ती योजनेपासून मागासर्वीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य व महाविद्याल जबाबदार राहतील असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे


