वेंगुर्ला प्रतिनिधी- शहरातील एका महिलेला मारहाण करणा-या तिच्या पतीस वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या महिला हेड कॉन्टेबलवरच त्या व्यक्तीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली.
कॅम्प येथील मेघना मोहनदास आडकर (४५) या आपला नवरा आपणास मारहाण करीत असल्याची तक्रार देण्यासाठी वेंगुर्ला पोलीस स्टेशनमध्ये ९ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता आल्या होत्या. त्यांनी पतीकडून वारंवार होत असलेल्या मारहाणीबाबतची कैफियत मांडली. आपल्या जीवास पतीकडून धोका तसेच पती अजून आपणास मारहाण करेल, या भीतीने त्या घरी जाण्यास घाबरत होत्या. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना ही घटना समजताच त्यांनी सदर महिलेस तिच्या घरी सोडण्यासाठी व तिच्या पतीस समज देण्यासाठी हेड कॉन्स्टेबल रुपाली वेंगुर्लेकर यांना त्यांच्यासोबत पाठवले. मात्र पत्नी पोलिसांना घेऊन घरी आल्याच्या रागाने मोहनदास विनायक आडकर याने घरातील कोयता घेऊन येत हेड कॉन्स्टेबल रुपाली वेंगुर्लेकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वेंगुर्लेकर गंभीर जखमी झाल्या तशाच अवस्थेत त्या वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या त्यांना तात्काळ वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना विश्रांती घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी केल्या. त्यानुसार त्यांना घरी पाठविण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विलासराव-देशमुख-अभय-योज/
दरम्यान, प्राणघातक हल्ला व शासकीय कामकाजात अथळा आणल्याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहनदास याला अटकही करण्यात आली. सोमवारी आरोपी मोहनदास याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सावंतवाडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोनक यांनीही या घटनेची माहिती मिळताच रुपाली वेंगुर्लेकर यांची विचारपूस केली. अधिक तपास रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ल पोलीस निरीक्षक अतुल जाया पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आरोग्य-रक्षक-गावातील-आर/



[…] राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवार्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. या भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आलेले आहे. या क्रीडा धोरणातील मुद्दा क्र.6(5) नुसार खेळामधील बदलेले आधूनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नवीन खेळ, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षाकांना होणे आवश्यक आहे. तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्त्रावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांचे अद्यायावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण शिबीर कार्याक्रम आयोजीत करण्यात आला आहे.तरी पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन,जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-महिला-हवालदारावर-प्रा… […]