मालवण| प्रतिनिधी :- मालवण भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या प्रयन्नातून मालवण ग्रामीण रुग्णालयात १५ आणि १६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत विविध आजारांवर शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अल्प दरात शस्त्रक्रिया होणार असून. समर्थ बिल्डर आणि डेव्हलपर्सच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित केले आहे.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित भ.क.ल. वालावलकर रुग्णालय व संलग्नित ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयामार्फत या शस्त्रक्रिया होणार आहेत