वेंगुर्ला सुरेश कौलगेकर
जगावेख्यात क्रिकेटपटू क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस त्यांनी भोगवे परुळे व किल्ले निवती येथील समुद्रकिनारी परिवार व मित्रमंडळीं समवेत साजरा केला विशेष म्हणजे परुळे येथील मछली या रिसॉर्टमध्ये त्यांनी मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला
सिंधुदुर्ग जिल्हा एक पर्यटन जिल्हा विशेष ओळख या जिल्ह्याची आहे महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो येथील निळा क्षार समुद्र सोनेरी वाळू हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला नारळी-पोपळींच्या बागा आंबा व काजू झाडांची दाटी व हिरवेगार वनराई हे सर्वच पर्यटकांना मोहन घेते. याची भुरळ क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यालाही पडली भोगवे येथील एका समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित रिसॉर्ट मध्ये त्यांनी राहणे पसंत केलं. भोगवे पासून जवळ असलेल्या किल्ले निवृती येथील विस्तीर्ण असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूत त्यांनी क्रिकेटच मैदान जणू निर्माण होतं तसं क्रिकेट खेळत आपल्या क्रिकेट रसिकांना भरभरून दाद दिली. आपल्या निवडक चाहत्या समवेत त्यांनी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-मठ-येथे-सर्वा/
सचिनच्या जीवनातील हाफ सेंचुरी तळ कोकणातील भोगवे किनारी सचिनने केली सेलिब्रेट
सचिन तेंडुलकर वेंगुर्ले येथील भोगवे परुळे व किल्ले निवती परिसरात आला हे समजताच त्याच्या चाहत्यांनी सिंधुदुर्गातूनच नव्हे तर गोवा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक या भागातूनही थेट भोगवे किनारी दाखल झाले. मात्र सुरक्षिततेचा कारण असल्याने अनेकांना हिरमुसले व्हावे लागले. सचिन तेंडुलकर खेळायला लागला की आपले मन हरपत. क्रिकेट प्रेमी तासंतास टीव्हीवर त्याचा खेळ बघत स्वतःला हरपून जातात. मात्र क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा 50 वा वाढदिवस जीवनातील हाफ सेंचुरी ही मात्र त्याने तळ कोकणात येत त्याचे सेलिब्रेशन साजर केलं
सचिन तेंडुलकर यांच्या समवेत त्यांचा परिवार उपस्थित होता. त्यांचा मुलगा रोहन हा मात्र एकमेव सदस्य अनुपस्थित होता. त्याचबरोबर मित्र मंडळीही या वाढदिवसात सहभागी होते. मालवणी जेवण हे प्रत्येक पर्यटकांना हवेहवेसे वाटते त्यात ताजे मासे, मालवणी कडी, भाजलेले मासे, सोलकढी असं बरंच काही सचिनने आपल्या मालवणी जीवनातून चाखली एवढेच नव्हे वेंगुर्ल्याचा आंबा, काजू व इतर फळांचाही त्याने व त्यांच्या परिवार मित्रमंडळीने आस्वाद घेतला
सचिनच्या चहत्याने भोगवे किनारी साकारले सचिनचे वाळू शिल्प
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचे वाळू शिल्प भोगवे किनारी काढले. ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन राहिला आहे त्या ठिकाणापासून जवळच भोगवे किनारी ठिकाणी शिल्पकार रविराज चिपकर यांनी सचिनचे वाळू शिल्प साकारले. या वाळू शिल्पाची दाद दस्तुरखुर्द सचिननेही घेतली. सचिनच्या चहत्यांनी हे साकारलेले वाळू शिल्प पाहत सचिनच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सचिनच्या क्रिकेट वेड्या प्रेमींनी केलं.
एका शिष्याने सिंधुदुर्ग वाढदिवसाचे सेलिब्रेशन करून खऱ्या अर्थाने गुरूला दिलेली मानवंदना
संपूर्ण देशात सचिन तेंडुलकरचा पन्नासाव्या वाढदिवस हा दिमाखदार स्वरूपात प्रत्येकानी साजरा केला. मात्र सचिनने त्याच्या जीवनातील हाफ सेंचुरीचे सेलिब्रेशन म्हणजेच पन्नासावा वाढदिवस, त्याचे सिंधुदुर्ग सावंतवाडीतील क्रिकेट गुरु रमाकांत आचरेकर यांच्या भूमीत म्हणजेच भोगवे किनारी साजरा केला. सिंधुदुर्ग व सचिन तेंडुलकर याचे एक वेगळं नातं आहे. सचिन तेंडुलकरने गुरु रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले आणि यातूनच रमाकांत आचरेकर यांच शिष्य सचिन तेंडुलकर हा जगाविख्यात क्रिकेटपटू बनला. आचरेकर यांचंही नाव जगात प्रसिद्ध झालं.रमाकांत आचरेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठा अभिमान मिळाला. जणू याच अभिमानाची परतफेड करण्यासाठी सचिनने आपला 50 वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात भोगवे वेंगुर्ले तालुक्यातील किनारी साजरा केला. यातून एका शिष्याने खऱ्या अर्थाने गुरूला दिलेली मानवंदनाच म्हणावी लागेल
4 Attachments • Scanned by Gmail