प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
वेंगुर्ले- रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत निवती पोलीस ठाणे निवती ,पोलिस ठाणे हद्दीत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात पाट, म्हापण बाजारपेठ व केळूस येथील रिक्षाचालक तसेच वाहन चालक यांना वाहतूकीच्या नियमांचे पालन तसेच अापतकालीन संकटावेळी करावयाची अपघातग्रस्तांना मदतकार्य या बद्दल माहिती देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-टाटा-मुंबई-मॅरेथॉन-च्/
याच बरोबर अपघात घडूच नयेत यासाठी घ्यावयाची काळजी आणि त्यासाठी वाहनचालकांनी कोण कोणत्या नियमाचे पालन करावे या बद्दल माहिती देण्यात आली. तसेच टूव्हीलर वाहन धारकांनी हेल्मेटचा वापर का करावा, त्याचे फायदे व न वापरण्याचे तोटे या बद्दल विषेश माहिती देवून फोरव्हीलर धारकानीही सिटबेल्टचा वापर करणे का गरजेचे आहे याबद्दल जनजागृती मोहीम राबवली . त्या सोबत सद्या शालेय अल्पवयीन मुले वाहन सुसाट वेगात वाहन चालविताना आढळतात यासाठी निवती पोलिस ठाणे हद्दीतील शाळांना भेट दिली व तेथील शालेय विद्यार्थांना वाहतूकीचे नियम व शिक्षा या बद्दल माहिती
तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर किती धोकादायक ठरू शकतो या बद्दल स.का.पाटील विद्यालयातील विद्यार्थींना मार्गदर्शन निवती पोलिस ठाणेचे पोलिस निरिक्षक श्री. सुनिल राणे,पो.उपनिरिक्षक श्री .सुधीर कदम. यांनी केले.या वेळी बिट अमलदार श्री.कांबळे,श्री .भांगरे यांचेसह केळूस गावचे सरपंच योगेश शेट्ये.केळूस गावचे पोलिस पाटील. स.का.पाटील विद्यालयाचे मुख्याधापक आणि सह. शिक्षक यांचे अनमोल सहकार्य या मोहीमेस लाभले.
[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला लिनेस क्लबचा पदग्रहण सोहळा ८ जानेवारी रोजी गुरुलिला निवास येथे संपन्न झाला. शपथप्रदान अधिकारी म्हणून लिनेस च्या जेष्ठ पदाधिकारी प्राची मणचेकर व अध्यक्षस्थानी कुडाळ येथील जेष्ठ समाजसेविका अस्मिता बांदेकर उपस्थित होत्या. उपस्थितांचे स्वागत हेमा गावस्कर यांनी केले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रस्ता-सुरक्षा-सप्ताह-का/ […]
[…] […]