वेंगुर्ला प्रतिनिधी-जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा यांनी गरुडझेप महोत्सवांतर्गत शुक्रवारी आयोजित केलेल्या रस्सीखेच स्पर्धेस स्पर्धकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत होडावडा क्षेत्रपालेश्वर संघाने विजेता तर सिद्धेश्वर डाळकर ‘अ‘ संघ उपविजेता ठरला. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जबरदस्त-सांस्कृतिक-कला/
राऊळवाडा पेट्रोलपंपानजिक आयोजित केलेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंद बोवलेकर, उद्योजिका पुनम बोवलेकर, वृंदा गवंडळकर, माजी नगरसेवक उमेश येरम, न.प.च्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख अजित राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, परबवाडा तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील परब, देवेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रस्सीखेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, तसेच मंडळाचे कार्यकर्ते मंगेश परब, सिध्देश रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनंत रेडकर, कौशल मुळीक, स्वप्नील पालकर, प्रांजल वेंगुर्लेकर, सागर शिरसाट, बबन आंदुर्लेकर, शिवाजी राऊळ, चिंटू राऊळ, संजय भाटकर, शेफाली खांबकर, मनाली रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, नाथा बोवलेकर, निल नांदोडकर यांनी पारश्रम घेतले. या रस्सीखेच स्पर्धा कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ यांनी केले.
फोटोओळी – रस्सीखेच स्पर्धेतील क्षण.