वेंगुर्ला प्रतिनिधी
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर आमदारकीला उभे राहण्याचे खुले आश्वासन देत युतीचा धर्माचा अनादर करत आहेत यातून ते आपल्याच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर व संघ परिवारावर अविश्वास दाखवू पहात आहेत असे व्यक्तव्य करत असल्याचा खळबळजनक खुलासा वेंगुर्ला शिवसेना पक्षाचे पक्ष प्रवक्ते सुशील चमणकर यांनी वेंगुर्ले येथे केला
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तथा कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील जनतेने सलग तीन वेळा चढत्या मतांच्या संख्येने निवडून दिले आहे या मतदारसंघातूनच त्यांना अर्थ व गृहराज्यमंत्रीपद मिळाले आता तर त्यांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री त्याचबरोबर शिवसेना प्रवक्ता अशी मोठी पदे मिळाली आहेत आज या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत व अनेक विकास कामे होणार आहेत सर्वाधिक निधी हा या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली हे पत्रकार परिषदा घेत सातत्याने आमचे नेते दीपक केसरकर यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत केसरकर यांनीही या टीकेवर भाजप वरिष्ठ नेतृत्व दखल घेतील असे सांगत टीकेवर प्रती टीका करणे केवळ युतीचा धर्म पाळत टाळले आहे असे असतानाही राजन तेली मात्र सातत्याने टीका करत आहेत हे अत्यंत राजकारणातील चुकीचा पायंडा आहे
राजकारणात कोणीही कुठेही उभे राहून आपले अस्तित्व निर्माण करावे त्यास आपला कोणताही विरोध नाही मात्र नाईलाजाने असे सांगावे लागते की तेली हे कणकवली येथून सावंतवाडी येथे येत गलिच्छ राजकारण करू पाहत आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे त्यामुळेच राजन तेली यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला हे ते सातत्याने विसरत असावे यातूनच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता शांत संयमी व प्रगल्भ विचाराचे राजकारणी दीपक केसरकर यांच्या पाठीशी आहे हे जनतेने तीन वेळा विजयीश्री देऊन दाखवून दिले आहे कदाचित राजन तेली यांना त्यांचा झालेला पराभव अद्यापही पचनी पडलेला दिसत नाही त्यामुळे भाजप नेतृत्वाची परवानगी न घेता ते सातत्याने केसरकर यांच्यावर टीका करीत आहेत
आज राज्यात शिवसेना व भाजप सरकार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रीय मंत्री मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांची व संघ परिवाराशी आजही केसरकर यांचे राजकारणापलीकडचे मैत्रीचे संबंध आहेत या सर्व नेतृत्वांनी शिवसेना व भाजप युती ही भविष्यात कायम राहील असे संकेत दिलेले असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली हे युतीचा धर्म न पाळता युतीच्याच जबाबदार मंत्र्यांवर व शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्यांवर टीका टिपणी करत आहेत हे शिवसेना पक्ष कदापिही खपवून घेणार नाही त्यामुळे राजन तेली यांनी युतीचा धर्म पाळावा असे सामान्य शिवसैनिकाचा व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा सल्ला आहे असे वेंगुर्ला शिवसेना पक्षप्रवक्ते सुशील चमणकर यांनी मत व्यक्त केले आहे यावेळी मच्छीमार सेल अध्यक्ष गणपत केळुस्कर प्रकाश मोटे शिवाजी पडवळ आदि उपस्थित होते
फोटो ओळी
वेंगुर्ला शिवसेना पक्ष प्रवक्ते सुशील चमनकर पत्रकारांशी संवाद साधताना सोबत मच्छीमार सेलचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष गणपत केळुसकर प्रकाश मोटे शिवाजी पडवळ