Sindhudurg: रेडी येथील यशवंतगडाच्या तटबंदीनजिक अनधिकृत बांधकाम

0
142
यशवंतगडाच्या तटबंदीनजिक अनधिकृत बांधकाम

जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी केली पाहणी

वेंगुर्ला प्रतिनिधी- रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलदुर्ग यशवंतगडाच्या तटबंदीला लागून होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची पहाणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी कार्यकर्त्यांसह केली. दरम्यान, यातील दोषींवर संघटीत गुन्हेगारीच्या कलमानुसार मोक्का लावण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-दापोली-येथील-चंद्रनगर-श/

   तटबंदीलगत मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले असून यामुळे तटबंदीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. येथे होत असलेल्या बांधकामाला परवानगी कोणी दिली? एवढ्या मोठ्या प्रमाणात  उत्खनन होई पर्यंत शासकीय यंत्रणा झोपली होती का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जलदुर्गाला धोका पोहोचवणा-यांवर कोणती कारवाई होणार? हे कृत्य म्हणजे संघटीत गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारीच्या कलमानुसार मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे. यावेळी वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, माजी उपसभापती सिद्धेश परब, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, अभिजीत राणे, आनंद गोडकर इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटोओळी – यशवंतगडाच्या तटबंदीनजिक अनधिकृत बांधकाम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here