आ. वैभव नाईक यांची बैठकीला उपस्थिती;विकासकामांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न
प्रतिनिधी :पांडुशेठ साठम
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.यावेळी विविध विकास कामासंदर्भात लोकप्रतिनिधींशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीही या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणातील-जिल्हात-भात-नाच/
यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदींसह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


