Sindhudurg: वेंगुर्ला आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी, अंकिता प्रथम

0
48
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी, अंकिता प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित सलग २२ व्या वर्षी शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून श्रावणी राजन आरावंदेकर (दाभोली) तर खुल्या गटातून अंकिता सुहास नाईक (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

खुल्या गटातून दहा तर शालेय गटातून सोळा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शालेय गटातून द्वितीय-अदिती विवेक चव्हाण, तृतीय-यशराज महेश नाईक तर उत्तेजनार्थ प्रथम-वरदा संदीप परब (सर्व वेंगुर्ला) व द्वितीय-नाविन्य सचिन डोळस (मालवण) यांनी प्राप्त केला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यातील-भव्य-दश/

खुल्या गटातून द्वितीय-प्रसाद विश्वनाथ खडपकर (नवाबाग)तृतीय -राहुल विलास वाघदरे (घारपी-सावंतवाडी),  उत्तेजनार्थ प्रथम-करण लक्ष्मण करंगुटकर (वेंगुर्ला) व द्वितीय-श्रुती श्रीधर शेवडे (परबवाडा) यांनी प्राप्त केला.

स्पर्धेचे बक्षिस वितरण प्राचार्य डॉ.विलास देऊलकरसुरेंद्र चव्हाणमाजी अधिक्षक प्रदिप परबपरीक्षक बी.टी.खडपकरप्रा. शशांक कोंडेकरअजित राऊळ व प्रा.वामन गावडे यांच्या हस्ते झाले.

 यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई व पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई तसेच प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी विशेष कौतुक केले. या स्पर्धेसाठी सर्व चषक बी.के.कॉलेज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादितवेंगुर्ला यांनी पुरस्कृत केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर आभार संजय पाटील यांनी केले.

फोटोओळी – वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यना प्राचार्य देऊलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here