Sindhudurg: वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मॅक्सिमियन कार्डोज

0
23
वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मॅक्सिमियन कार्डोज
वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मॅक्सिमियन कार्डोज यांची बहुमताने तसेच सचिवपदी विनायक वारंग, सहसचिवपदी सीमा मराठे, उपाध्यक्षपदी महेंद्र मातोंडकर व योगेश तांडेल तर खजिनदारपदी प्रथमेश गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वेंगुर्ला प्रतिनिधी-  वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी मॅक्सिमियन कार्डोज यांची बहुमताने तसेच सचिवपदी विनायक वारंग, सहसचिवपदी सीमा मराठे, उपाध्यक्षपदी महेंद्र मातोंडकर व योगेश तांडेल तर खजिनदारपदी प्रथमेश गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कलर्स-मराठीवरील-तात्य/

 वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती सन २०२३ ते २०२५ सालासाठी नविन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी पत्रकार संघाच्या कार्यालयात निरिक्षक बाळ खडपकर व राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. मॅक्सिमियन कार्डोज व अजित राऊळ यांच्यात अध्यक्षपदासाठीची निवडणूक होऊन श्री.कार्डोज यांची बहुमताने निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीला मावळेत अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के.जी.गावडे, खजिनदार एस.एस.धुरी, भरत सातोसकर, जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष दाजी नाईक, जिल्हा सदस्य दिपेश परब, रविकिरण परब, समिती गोसावी, सुरज परब, विवेक गोगटे, संदेश राऊळ, शंकर घोगळे, आपा परब, अनिल राणे, अजय गडेकर आदी उपस्थित होते. समितीतर्फे विविध कार्यक्रम राबवून जिल्ह्यात आदर्शवत काम करण्याचा मनोदय नूतन अध्यक्ष श्री.कार्डोज यांनी व्यक्त केला. नूतन सचिव विनायक वारंग यांनी आभार मानले.

फोटोओळी – पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष मॅक्सिमियन कार्डोज यांचे बाळ खडपकर व राजन नाईक यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here