sindhudurg: वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

1
214
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

१६ वर्षाखालील शालेय व १६ वर्षावरील खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शालेय गटासाठी ‘मराठी भाषेसमोरील आव्हाने‘ किवा ‘मराठीला राजभाषा दर्जाची गरज‘ असा विषय देण्यात आला आहे. स्पर्धकांना विषय सादरीकरणासाठी ५ मिनिटे वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रथम विजेत्या तीन क्रमांकांना रोख रुपये १०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना पत्येकी ३०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudugr-शिक्षकांच्या-समस्या-पू/

खुल्या गटासाठी ‘नवीन कामगार धोरण तारक की मारक‘ किंवा ‘कामगार आणि सरकार‘ असे विषय आहेत. यातील एका विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी स्पर्धकाला ७ मिनिटे एवढा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. प्रथम तीन विजेत्यांना रोख रुपये २०००, १५००, १००० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी ५०० रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकांनी सहसचिव सीमा मराठे (९६८९९०२३६७) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज व सचिव विनायक वारंग यांनी केले आहे.

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- मूळ भारतीय व ब्राझिल येथील किप दी बॅल रोलिग तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संस्थापक विजय बावसकर व दीपाली बावसकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी कोकणातील वाया जाणारा काजू बोंडू ब्राझिलच्या धर्तीवर उपयोगात आणण्यासाठी काय करता येई यासंदर्भात येथील शास्त्रज्ञ, काजू कारखानदार व काजू उत्पादक यांच्याशी चर्चा केली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-तालुका-पत्रक-3/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here