Sindhudurg: वेंगुर्ला येथे ३१ ऑक्टोबर रोजी चित्रकला व स्लोगन लेखन स्पर्धा

0
37
मुंबई विद्यापीठ आयोजित ‘अविष्कार’ स्पर्धा

वेंगुर्ला प्रतिनिधी- ३१ ऑक्टोबर हा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या विद्यमाने वेंगुर्ला येथील हॉटेल लौकिकच्या सभागृहामध्ये ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-पोलिसअधीक्/

यावेळी राष्ट्रीय एकतेविषयी युवकांना शपथ दिली जाणार आहे. तसेच ‘भारत-विविधतेतून एकता‘ यावर खुली चित्रकला स्पर्धा होणार असून यातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५५५, ४४४, ३३३ व मेडल आणि प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ प्रथम दोन विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. चित्र रंगविताना जलरंगाचा वापर करणे अनिवार्य आहे.https://sindhudurgsamachar.in/goa-गोवा-रेडक्रॉसतर्फे-सेवा/

राष्ट्रीय एकता यावर स्लोगन लेखन स्पर्घा घेतली जाणार असून यातील प्रथम विजेत्यांना मेडल आणि प्रमाणपत्र तर सहभागींना फक्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी रोहन राऊळ (९२८४६९८९८१) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा नेहरू युवा केंद्र समन्वयक मोहितकुमार सैनी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here