17 जणां सह 3 लाख 84 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
वेंगुर्ले – दाभोली गळकर देवस्थान परिसरात एका चिरेबंदी इमारतीत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्यासह पथकाने धाड टाकली. यावेळी जुगार खेळताना व खेळविताना असे मिळून एकूण 17 जणां सह 3 लाख 84 हजार 840 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने आदी मुद्देमाल ताब्यात घेऊन वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वेंगुर्ले परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस विभागाला मिळाली होती. त्यानुसार चौकशी करून सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र जुगार बंदी अधि.कलम 4,5 प्रमाणे पोलीस सचिन अशोक सोनसुरकर यांनी दिलेल्या तक्रारी नुसार गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकून कारवाई करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंकी यांच्यासह पोलीस सोंसुरकर, रामचंद्र करंगुटकर, अमित राऊळ, रामदास चव्हाण, सचिन कोयंडे यांनी दाभोली येथे सायंकाळी धाड टाकली. त्यावेळी जुगार सुरू असताना या पथकातील पोलिसांनी बाबुराव गोविंद मठकर राहणार मठ सिद्धार्थनगर, तालुका वेंगुर्ला, नरेंद्र रमेश तांडेल, रा. उभादांडा, वेंगुर्ला, महादेव विठ्ठल भगत,राहणार सुंदर भाटले तालुका वेंगुर्ले, संजीवन चंद्रकांत गावडे, रा गावडेवाडी वेंगुर्ला, महेश नारायण भाईडकर, रा. उभादांडा वाघेश्वरवाडी, संजय कृष्णा नाईक, रा. मठ गावठणवाडी, विश्वास रमाकांत परुळेकर, रा. सुंदरभाटले, वेंगुर्ला, ज्ञानेश्वर संभा कोचरेकर, रा. उभादांडा कुर्लेवाडी, ज्ञानेश्वर वासुदेव हुले राहणार कॅम्प वेंगुर्ला, शंकर नारायण गावडे राहणार मोचेमाड होळकरवाडी वेंगुर्ला, यशवंत भास्कर परब,राहणार कॅम्प वेंगुर्ला, सुधाकर भिकाजी दाभोलकर राहणार दाभोली आंबेडकर नगर वेंगुर्ला, राजन लक्ष्मण वेंगुर्लेकर, राहणार वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा, अमित राजन वेंगुर्लेकर राहणार वेंगुर्ला कॅम्प, वेंगुर्ला, बाळा प्रभाकर राऊत राहणार सुंदर भाटले वेंगुर्ला, मिलिंद जयराम सोनुर्लेकर राहणार गाडी अड्डा वेंगुर्ला, अशोक झीलू कांबळी राहणार वेंगुर्ला भेंडमळा, वेंगुर्ला या 17 जनासह मुद्देमाल व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास वेंगुर्लेचे पीएसआय दाभोलकर हे करत आहेत.