वेंगुर्ला प्रतिनिधी– कॅनरा बँक शाखा वेंगुर्लातर्फे ‘विद्या ज्योती‘ शिष्यवृत्ती अंतर्गत शाखाधिकारी धनराज आंबेतकर यांच्या पुढाकाराने वेंगुर्ला येथील सहा मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ले-दाभोली-येथे-त/
एससी/एसटी सवलतीत शिक्षण घेणा-या मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे, त्यांना आर्थिक आधार मिळावा हा बँकेचा हेतू आहे. बँकेने प्रत्येक वर्गात मेरीटमध्ये येणा-या मुलींसाठी ५वी ते ७वीच्या स्तरावर रु. २५०० व ८वी ते १० वी च्या स्तरावर रु ५००० अशी रोख पारितोषिक ठेवलेली आहेत. यासाठी अधिकारी प्रमोदकुमार सबर व महेंद्र कुमार ठाकूर यांचेही सहाय्य लाभले. शिष्यवृत्ती मिळालेल्यांमध्ये रा.कृ.पाटकर हायस्कूलच्या मृणाली शशिकांत दाभोलकर (पाचवी), अंतरा अरुण दाभोलकर (सहावी), गुंजन दिपक चव्हाण (सातवी), सानिका लूमा खानोलकर (आठवी), तन्वी संजय खानोलकर (नववी), भावना संतोष मोचमाडकर (दहावी) या मुलींचा समावेश आहे. शिष्यवृत्ती वितरणप्रसंगी शाखाधिकारी धनराज आंबेतकर, मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, प्रा.महेश बोवलेकर, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम बागलकर यांच्यासह विद्याथी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
फोटोओळी – कॅनरा बँक शाखाधिकारी धनराज आंबेतकर यांनी मुलींना विद्याज्योती शिष्यवृत्ती प्रदान केली.