Sindhudurg: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

0
86
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

ओरोस: शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार,उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) पुरस्कारासाठी दि. ३० जानेवारी पर्यंत इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू,दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मालवण-ग्रामीण-रुग्णालय/

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शासनाने नुकत्याच दि. १४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे.

या नियमावलीनुसार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू. क्रीडा मार्गदर्शक. खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास उपलब्ध असून अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here