वेंगुर्ला प्रतिनिधी- नुकत्याच पार पडलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साई मंगल कार्यालय येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्याचे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या मासिक बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातही चर्चा करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महिंद्राने-त्यांच्या-त/
वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा १२ जानेवारी रोजी येथील तालुका संफ कार्यालयात तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, शहर महिला संघटक मंजुषा आरोलकर, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, सुधाकर राणे, तुषार सापळे, उदय गोवेकर, नीलेश चमणकर, वसंत साटम, नम्रता बोवलेकर, सुनील बोवलेकर, श्रीकांत घाटे, अभि मांजरेकर, आनंद बटा, सुमन कामत आदी उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच यांचा २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील साई मंगल कार्यालय येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक, संफप्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा मतदारसंघ संफप्रमुख शैलेंद्र परब, अतुल रावराणे, विक्रांत सावंत, संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्याचे ठरले.
या सभेत आगामी न. प., जि. प., पं. स. निवडणुकां संदर्भात चर्चा करुन संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ब-याच ठिकाणी काही उमेदवारांना किरकोळ मतांनी पराभव पत्करावा लागला. तर काही ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ले असलेल्या ठिकाणीही पराभव पत्करावा लागला या मागच्या कारणांचा अभ्यास करुन पुढील निवडणुकांमध्ये या चुका सुधारण्याचे ठरले. तसेच पक्षाची सभासद नोंदणी जास्तीत-जास्त करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब यांनी मार्गदर्शन केले. आभार उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख अजित राऊळ यांनी मानले.
फोटोओळी -शिवसेनेच्या मासिक बैठकीत तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी मार्गदर्शन केले.
[…] मुबंई- राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी मिळणार आहे. मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्णची अट कायम राहणार आहे. २६ जानेवारीनंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शिवसेनेच्या-मासिक-बैठ… […]