Sindhudurg: सखी मंचातर्फे आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला दिन संपन्न

0
138
सखी मंच
सखी मंच

वेंगुर्ला प्रतिनिधी- सखीमंच वेंगुर्ल्याच्यावतीने ८ मार्च साई मंगल कार्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. याचे उद्घाटन ज्येष्ठ महिला निला यरनाळकर, सुनंदा सामंत, प्रभाताई साळगांवकर, सुहासिनी अंधारी यांच्या हस्ते झाले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-कर्मचाऱ्यांच्या-आंदोल/

 चित्रा प्रभूखानोलकर यांनी गणेशवंदना सादर केली. चैत्ररामनवमी गटातर्फे रामरक्षा पठण झाले. साक्षी पेडणेकरप्रार्थना हळदणकरपुनम बोवलेकरमयुरी केरकरगौतमी भोगटे यांनी सोलो डान्स सादर केले. रामघाट ग्रुपझुंबा ग्रुपभाजप महिला ग्रुपइनरव्हील ग्रुपहर्षद गवंडे ग्रुपसई लिगवत ग्रुपयुगंधरा स्वयंसहाय्यता गट यांनी विविध ग्रुपडान्स सादर केले. सीमा नाईकविशाखा पवारतृप्ती पवार यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. निलम कामत यांनी कोळीनृत्य सादर केले. यावेळी आयोजित केलेल्या फनीगेम्स व लकी ड्राॅमध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग दर्शविला. यासाठी तृप्ती आरोसकर व प्रिया सावंत यांचे सहकार्य लाभले. राधिका सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले. तर स्नेहा कुबल यांनी आभार मानले. 

फोटोओळी – सखी मंचातर्फे आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ महिलांच्या हस्ते झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here