Sindhudurg: समुहगीतमध्ये वेताळ विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम

0
88
समुहगीतमध्ये वेताळ विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय समुहगीत गायन  लहान गट स्पर्धेत श्री वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले कविवर्य सुरेश भट लिखित ‘गे मायभू तूझे मी‘ या गीताने प्रथम क्रमांक मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सरंबळ-इंग्लिश-स्कुल-सरं/

जिल्हा परिषद आयोजित महोत्सव २०२२-२०२३ मध्ये या गीताने केंद्रस्तरप्रभागस्तरतालुका स्तरावर अव्वल स्थान प्राप्त करून जिल्हास्तरावर सहभाग घेतला होता. श्री वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेतील विद्यार्थ्यांनी या आधीही विविध स्तरावर समुहगीत स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. तसेच या शाळेत पालक व समाज सहभागातून राबविलेल्या विविध शैक्षिणक  उपक्रमांमुळे शाळेची उपक्रमशील शाळा म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रेउपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणेशोभराज शेर्लेकरमाजी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकरवेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावीविस्तार अधिकारी सुनिता भाकरेमाजी गटशिक्षणाधिकारी एम.पी.मेस्त्रीसावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडकेम.ल.देसाईके.टी.चव्हाण केंद्रप्रमुख लवू चव्हाणशालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव राऊळ यांनी तसेच जिल्हातील शिक्षक व कला प्रेमी नागरिक यांनी मुलांचे तसेच शिक्षक शितल गावडे व एकनाथ जानकर यांचे अभिनंदन केले आहे.

फोटोओळी – समुहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त वेताळ विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here