वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ल्याचे सुपुत्र तथा नाट्य, मालिका आणि चित्रपट अभिनेते अतुल महाजन यांचा त्यांच्या निवासस्थानी सारस्वत समाज तालुकाध्यक्ष सौ.सुजाता पडवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-भारतीय-बौद्ध-महासभा-सिध/
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तु मला‘ या मालिकेतील श्री. महाजन यांनी साकारलेल्या ‘तात्या कारेकर‘ या व्यक्तिरेखेला उत्कृष्ट वडील म्हणून पुरस्कार मिळाला. गेली अनेक वर्षे अतुल महाजन हे नाटक, मालिकांमध्ये काम करीत असून नुकतेच ‘कैरी‘ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ते वेंगुर्ला येथे आले होते.
अतुल महाजन यांचे शालेय शिक्षण वेंगुर्ला हायस्कूल आणि महाविद्यालयील शिक्षण बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे झाले. कै.शशिकांत यरनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभिनेता म्हणून घडत गेलो असे अतुल महाजन यांनी यावेळी सांगितले. या सत्कार समारंभाला नीला यरनाळकर, साळगांवकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, तृप्ती आरोसकर, सीमा नाईक, संजय पुनाळेकर, डॉ.प्रसाद प्रभूसाळगांवकर, अमोल खानोलकर, सौ.राखी दाभोलकर, सौ.झांटये यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व इतर ज्ञातीबांधव उपस्थित होते.
फोटोओळी – सारस्वत समाजातर्फे सुजाता पडवळ यांच्या हस्ते अभिनेते अतल महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.