कर्ज प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसतानाही रानबांबूळी सरपंचाना ग्रामपंचायतीत घुसून मारण्याची धमकी
सिंधुदुर्ग- अभिमन्यू वेंगुर्लेकर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी सावकार आणि फायनान्सवाल्यांची दांडगाई वाढत चालली आहे. पोलिसांनी अनेक प्रकरणात बोटचेपी भूमिका स्विकाल्याने जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना जिल्ह्यात वाढत आहे. https://sindhudurgsamachar.in/जानेवारी-2023-पासून-अल्पबचत-य/
याबाबत अधिक माहिती अशी कि, रानबांबुळीचे सरपंच श्री परब यांना कोटक महिंद्रा बॅंकेतून बोलत असल्याचे बतावणी करणारा फोन आला. त्यात समोरच्या व्यक्तीने गावात बोभाटे कोण आहेत अशी विचारणा केली. आम्हाला बोभाटेचे फोन नंबर मिळवून द्या असे सांगितले. तसेच सरपंच रानबांबूळी यांनी अधिक चौकशी केली असता बोभाटे यांनी बॅंकेशी डिफॉल्ट केला असे सांगितले आणि एकदा फ्रॉड केला म्हणत अडीज लाखाच्या दरम्यानची रक्कम असल्याचे सांगितले. आमची सिंधुदुर्ग वसूली टीम पोलिस घेऊन येत आहे तुम्ही त्यांच्या घरी जाऊन बसा असे सांगताच सरपंच परब म्हणाले की,’ तुम्ही गावात, ग्रामपंचायतीत या आपण विषय समजून घेऊ.’ त्यावर समोरच्या व्यक्तीने आमची टीम पोलीस फोर्ससह तिथे येत आहे, तुम्ही जाऊन तिथे बसा असा जवळपास आदेशच सोडला.
सरपंच त्याच्या उर्मट भाषेवर वैतागले आणि ‘तुमचे सगळे रीतसर आहे तर तुम्ही तुमची कारवाई करा, तुम्हाला पंच आणि सरपंच तरी कशाला हवेत?’ असे सुनावले. त्यानंतर बराच वेळ वाट पाहूनही ही टीम आली नाही. म्हणून सरपंच परब यांनी फोन लावला आणि काय झाले त्याची विचारणा केली. त्यावर आमची टीम येतेय तुम्ही बोभाटेच्या घरी जाऊन बसा असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. तेव्हा पुन्हा सरपंचांनी त्यांना ग्रामपंचायतीत येण्यास सांगितल्यावर तुम्ही सरपंच आहात की गावचे चोर अशी विचारणा केली तेव्हा सरपंचानी तुम्हाला सरपंच म्हणजे तुमचा नोकर वाटतो का असे विचारल्यावर तुला तिकडे ग्रामपंचायतीत घुसून मारणार अशी धमकी त्यांना देण्यात आली. सरपंचाना शिव्या देत अतिशय घाणेरडी भाषा वापरली. त्यामुळे रानबांबूळीचे सरपंच यांनी कोटक महिंद्रा बॅंकेचे नाव घेवून शिवराळ भाषेचा प्रयोग करीत धमकी देणाऱ्या इसमा विरोधात ओरस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही जी सिंधुदुर्गची कोटक महिंद्राची टीम कोण होती? पोलिसांचे संरक्षण त्यांना मिळाले होते का? आणि पोलीस संरक्षण वापरून त्याआडून असली मुजोरी होणार होती का? पोलीस संरक्षण घेऊन जर कोणीही गुंडपुंड सरपंचालाच ग्राम पंचायतीत घुसून मारण्याची धमकी देत असतील तर या प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय? हेच पहावे लागेल. बॅंक- फायनांन्सवाले सर्वसामान्य अडचणीत सापडलेल्या कर्जदाराच्या बाबतीत कसे वागत असतील? याची कल्पना येते. आजकाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक आत्महत्या आकस्मिक मृत्यू म्हणून फाईलबंद झाल्या. त्यामागे हे बेकायदेशीर वसुली व छळाचे कनेक्शन आहे का?
याचाही आता तपास व्हायलाच हवा
कारण काडीमात्र संबंध ह्या कर्ज प्रकरणाशी नसलेल्या सरपंचाला फक्त तो त्या गावचा सरपंच आहे म्हणून, आणि आपल्या नोकरासारखा सांगकाम्या होऊन वागत नाही म्हणून ग्रामपंचायतीत घुसून मारण्याची धमकी देण्याइतकी जर मजल फायनांन्स वसुलींची जात असेल, तर प्रश्न गंभीर आहे सामान्य कर्जदाराच्या बाबतीत काय होत असेल? याचा विचार व्हायला हवा फक्त पैसे भरून वसुलीसाठी पोलीस संरक्षण देण्याचे निकर्ष आता बदलावे लागतील. सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्गमधील जनता कायद्याचा मान राखते याचा अर्थ असा नव्हे की त्यांची कायदा दाखवून मान दाबावी. कोंडून घातलं तर मांजरसुद्धा नरड्यीचा घोट घेते हे कर्ज वसुलिंनी लक्षात घ्यावे अशी संतप्त प्रतिक्रीया व्याक्त होत आहेत. इन्सुलीतल्या एका वसुली प्रकरणात काय झाले होते त्याचा अभ्यास एकदा सर्वांनीच करायची गरज आहे, पोलीस यंत्रणेने तर अधिक गांभीर्याने लक्ष द्यायला हवे! सिंधुदुर्ग आपल्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडतोय, बेकायदेशीर दादागिरीने अडचणीतल्या जनतेचा गळा दाबायला जाऊ नका. इन्सुलीची पुनरावृत्ती कधी होऊच शकत नाही, या भ्रमात कोणीही राहू नये. आत्यंतिक दबावापोटी कोकणी माणूसही वेगळा निर्णय घ्यायला मजबुर होऊ शकतो. ती वेळ येऊ न देण्याची जबाबदारी समाजाच्या सर्वच घटकांवर असल्याचे बोलले जात आहे.