मुंबई बरोबरच आता हैद्राबाद व म्हैसूर, हि महत्वाची शहरे सिंधुदुर्गला विमानसेवेने जोडली जाणार
वेंगुर्ले : सुरेश कौलगेकर
आय आर बी इन्फ्रा ने विकसित केलेल्या सिंधुदुर्ग विमानतळावरून दिनांक १ फेब्रुवारी २०२३ पासून आता दुसर विमान उड्डाण करणार आहे.
मुंबई – सिंधुदुर्ग- मुंबई हि विमानसेवा देणाऱ्या अलायन्स एअर या कंपनी तर्फेच या हैद्राबाद – म्हैसूर सिंधुदुर्ग- म्हैसूर – हैद्राबाद या दुसऱ्या विमानसेवेचा प्रारंभ करण्यात करण्यात येत असून, सुरवातीच्या काळात दर बुधवारी आणि रविवारी अशी आठवड्यातून दोन दिवस हि सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. https://sindhudurgsamachar.in/म-प्र-राजधानी-भोपाळ-येथे-आ/
या सेवेच्या प्रारंभाने सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैद्राबाद आणि दक्षिणेस म्हैसूर या देशातील अत्यंत महत्वाच्या शहरांशी विमानसेवेने जोडला जाणार आहे. विमान कंपनी मार्फत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, सदरहू विमान दर बुधवारी हैद्राबाद वरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी ५.३० वा सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी ६.०० वा म्हैसूर मार्गे हैद्राबाद करीता उड्डाण करेल; तर दर रविवारी हैद्राबाद वरून निघून म्हैसूर मार्गे सायंकाळी ५.३० वा सिंधुदुर्ग विमानतळावर उतरेल व सायंकाळी ६.३० वा म्हैसूर मार्गे हैद्राबाद करीता उड्डाण करेल. तरी, कोंकणातल्या जास्तीत जास्त प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.दरम्यान सध्या अलायन्स एअर ची सिंधुदुर्ग- मुंबई विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस उपलब्ध