Sindhudurg: सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शरद मेस्त्री

0
75
सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शरद मेस्त्री

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्षपदी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यातील-नाट्यकर्म/

मंडळाच्या झाराप येथील कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीनंतर नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-रितेश  सुतार (वैभववाडी), सचिव-राजन पांचाळ (पिगुळी), खजिनदार-अनंत मेस्त्री (माणगांव), सहसचिव-गुरुनाथ मेस्त्री (साळगांव), सदस्य-आनंद मेस्त्री (वाडोस), महेश सुतार (कणकवली), नारायण सुतार (दोडामार्ग), सुनिल मेस्त्री व प्रभाकर मेस्त्री (वजराठ), राजन मेस्त्री (डिगस), शैलेश मेस्त्री (सावंतवाडी), महादेव मेस्त्री (पुळास), स्वप्नाली मेस्त्री व नारायण मेस्त्री (झाराप), बाबाजी मेस्त्री (मालवण) यांचा समावेश आाहे. मावळते अध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी शरद मेस्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटोओळी – सुतार समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरद मेस्त्री यांचे आनंद मेस्त्री यांनी अभिनंदन केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here