Sindhudurg: सुभाष साबळे ‘डॉ.सर्वपल्ली शिक्षकरत्न’ पुरस्काराने सन्मानित

2
317
सुभाष साबळे 'डॉ.सर्वपल्ली शिक्षकरत्न' पुरस्काराने सन्मानित

वेंगुर्ला प्रतिनिधी- नागपूर येथे मदत सामाजिक संस्थेच्यावतीने २६ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भारतीय संविधान शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. https://sindhudurgsamachar.in/covid-कोलकाता-विमानतळावर-परदे/ https://sindhudurgsamachar.in/फिक्की-च्या-संचालक-मंडळ-न/

सुभाष साबळे हे प्राथमिक शिक्षक असून त्यांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आमदार माजी उर्जा व पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे, नाळ चित्रपटातील सिनेकलाकार तक्षशिला वाघमारे, गुरुदेव सेवामंडळाचे अध्यक्ष अॅड.अशोक यावले, मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रा.पकाश सोनक, सचिव दिनेशबाबू वाघमारे आदी उपस्थित होते.

फोटो – सुभाष साबळे