वेंगुर्ला प्रतिनिधी – हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमर आणल्याने मोदी सरकार व भाजपा हे राहूल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपाने राहूल गांधींविरोधांत अनेक ठिकाणी खटले दाखल करुन त्यांना अडकविण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ज्या पद्धतीने मोदी सरकार राहूल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही काँग्रेसच्यावतीने निषेध करत असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी बोलताना सांगितले.https://sindhudurgsamachar.in/एल-अँड-टी-सुफिनने-बां/
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसने वेंगुर्ला येथे मोदी सरकारचा निषेध करुन मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे, रेडी जिल्हापरिषद विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर, मयूरेश घाडी, साईश परब, किरण मुसळे, पांडुरंग सावंत, संकेत वेंगुर्लेकर, प्रथमेश हरमलकर, तन्मय वेंगुर्लेकर इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना शेख म्हणाले की, राहुल गांधी ज्या पद्धतीने मोदी सरकारच्या कुकर्माची लक्तरे वेशीवर टांगत आहेत त्यामुळेच मोदी सरकारच्या पायाखालील वाळू सरकली आहे. म्हणूनच राहुल गांधी यांना संसदीय कामकाज पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वातंत्र्य पूर्वकाळात सुद्धा ब्रिटिश स्वातंत्र्य सैनिकांवर असेच गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकत होते. त्याच प्रमाणे आज ही सत्तेत असलेले सत्य बोलणा-या आणि जनतेच्या हितासाठी लढणा-या आणि ठराविक उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करणा-या मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवणा-या राहुल गांधींसारख्यांवर सुडबुद्धीने कारवाई करत आहे. गो-या ब्रिटिशांना काँग्रेसने या देशातून हाकलून दिले आता या काळ्या ब्रिटिशांना सत्तेवरून हाकलून देण्याची वेळ आली आहे.
फोटोओळी – काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध करुन त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी देण्यात आली.


