प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
कुडाळ- कुडाळ तालुक्यातील बाव येथील दीपाली विजय गावकर या २५ वर्षीय सिंधुकन्येने जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्त होण्याचा मान मिळविला. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व शेतात राबून शिक्षण पूर्ण करणाऱ्या दीपाली यांच्या या यशाबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज तिच्या घरी भेट देत शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन तिचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.https://sindhudurgsamachar.in/kokan-सागरी-महामार्ग-रेवस-करंज/
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गवंडे, सचिन काळप,स्वप्नील शिंदे, बाळा पावसकर, अमित राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व गावकर कुटुंबीय उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सागर-तीर्थ-किनाऱ्यावरी/

