Sindhuurg: मठ वनपाल सावळा कांबळे यांना ‘रजत पदक‘

1
209
मठ वनपाल सावळा कांबळे यांना ‘रजत पदक‘

वेंगुर्ला प्रतिनिधी- वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढविण्याकरीता व त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहीत करण्याकरीता वेंगुर्ला तालुक्यातील मठ वनपाल सावळा सखाराम कांबळे यांना ‘रजत पदक‘ जाहीर झाले आहे. लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या उपस्थितीत होणा-या विशेष कार्यक्रमात श्री. कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhuurg-जिद्द-व-मेहनतीच्या-जोरा/

 श्री. कांबळे यांनी जानेवारी २००८ ते जानेवारी २०१७ या कालावधीत माणगाव खो-यात केरवडे, चाफेली, कालेली व वाडोस या अतिसंवेदनशील बिटवर काम करत वन्य हत्तींच्या बंदोबस्तामध्ये काम केले आहे. नोव्हेंबर २००८ ते फेब्रुवारी २००९ च्या हत्ती पकड मोहिमेत विशेष नेमणूक झाल्यावर एकूण ३ हत्ती पकडले होते. वनरक्षक वाडोस पदावर काम करताना त्यांनी वनातील अवैध वृक्षतोड व अवैध वाहतुकप्रकरणी ११ आरोपी पकडून त्यांच्याव वन गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली होती. तसेच तेर्सेबांबर्डे येथील फर्निचर मार्ट येथे माणगांव वनक्षेत्रातील पुण्यातील फरार लाकूड मालाची तपासणी करुन ६ हजार ७२५ रुपये इतका माल जप्त केला. अशा अनेक विविध कामांची शासनस्तरावर दखल घेत शासनाने सावळा कांबळे यांना रजत पदक जाहीर केले आहे.https://sindhudurgsamachar.in/breaking-दाभोली-ग्रामपंचायतीच्य/

फोटो – सावळा कांबळे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here