वेंगुर्ला प्रतिनिधी- विद्यार्थ्यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करावे आणि आपले ध्येय गाठावे असे आवाहन मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता शिवाजीराव पालव यांनी अणसूर-पाल हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी केले.
अणसूरपाल हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन ८ डिसेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता शिवाजीराव पालव, अणसूरपाल विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष आत्माराम गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य देऊ गावडे, दत्ताराम गावडे, दिपक गावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व अहवाल वराचन मुख्याध्यापिका शैलजा वेटे यांनी केले. बक्षिस वितरण नियोजन सौ.पेडणेकर व प्रिती गावडे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार राजेश घाटवळ यांनी मानले. ९ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sinhudurg-जानेवारीपासून-भंडारी-स/
फोटोओळी – अणसूरपाल हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता शिवाजीराव पालव यांनी मार्गदर्शन केले.