वेंगुर्ले – वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावची कु. पद्मा कृष्णाजी केळकर हिने द्वितीय वर्ष बी. ए .एम.एस.परीक्षेत गोवा विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय संस्कृती प्रबोधिनी संस्थेचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र,शिरोडा गोवाची विद्यार्थिनी कु. पद्मा कृष्णाजी केळकर हिने द्वितीय वर्ष बी ए एम एस परीक्षेत 78 टक्के गुण मिळवून गोवा विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला आहे https://sindhudurgsamachar.in/पत्रकार-भवनाच्या-भूमिपूज/
कु.पद्मा या परीक्षेत द्रव्यगुण,रोगनिदान,रसशास्त्र व भैषजकल्पना आणि चरक पूर्वार्ध या सर्व विषयात प्रथम आली आहे. यापूर्वी तिने प्रथम वर्षातही गोवा विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला होता. संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.के. घाटे सर,कार्यवाह श्री बखले सर,प्राचार्य अनुरा बाळे त्यांनी तसेच सर्व प्राध्यापकांनी आणि रुग्णालय कर्मचारी यांनी तिथे अभिनंदन केले आहे. कुमारी पद्मा ही वेंगुर्ले येथील होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य कृष्णाजी केळकर यांची कन्या आहे.


