Facebook Instagram Youtube
  • होम
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • गोवा
  • मनोरंजन
  • Jobs
  • योजना/Schemes
  • माझी कथा
  • मनोगत
  • ई पेपर Sindhudurg Samachar
Search
Logoसिंधुदुर्ग समाचारग्रामीण जनतेचे एकमेव लोकप्रिय मराठी दैनिक
Logoसिंधुदुर्ग समाचारग्रामीण जनतेचे एकमेव लोकप्रिय मराठी दैनिक
  • होम
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • गोवा
  • मनोरंजन
  • Jobs
  • योजना/Schemes
  • माझी कथा
  • मनोगत
  • ई पेपर Sindhudurg Samachar
Home Tags Arms Licence Renewal 2026

Tag: Arms Licence Renewal 2026

शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी संपूर्ण माहिती भरलेला Form A-3 अर्ज छायाचित्रासह सादर करणे आवश्यक आहे. तसेच शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणित करणारे तालुका ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्याकडील S-3 नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागेल. संबंधित पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी व शिक्क्यासह Form S-4, शस्त्र पडताळणी केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे प्रमाणपत्र तसेच सरपंच, पोलीस पाटील किंवा नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला अथवा आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. यासोबत मूळ शस्त्र परवानाही जोडावा. पाच वर्षांच्या नूतनीकरणासाठी २,५०० रुपये शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. विलंबाने अर्ज सादर करणाऱ्यांनी विलंबाचे सबळ कारण दर्शविणारा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. Form A-3 अर्ज तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे. नूतनीकरणाचे अर्ज पोस्टाद्वारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण केलेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविण्यात येणार नाहीत. त्यामुळे संबंधित परवानाधारकांनी आपल्या तालुक्यासाठी निश्चित केलेल्या तारखेलाच मूळ शस्त्र परवाना आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील उपचिटणीस शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नूतनीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
टॉप 5

शस्त्र परवान्यांची मुदत ३१ डिसेंबरला संपणार; नूतनीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर

EditorialTeam -
November 2, 2026
0
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • About us
  • Contact Us
© Newspaper WordPress Theme by TagDiv