Taliban: विमानातून पडणारा तो अफगाणचा राष्ट्रीय फुटबॉलपटू !

0
116

तालिबाननं अफगाणिस्तानची ताबा मिळवल्यानंतर (Afganistan Crises)देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून बहुतांश लोक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानमधून जाणाऱ्या अमेरिकी विमानांना लटकून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात खाली पडणाऱ्या लोकांचे भयावह व्हिडीओ समोर आला होता. आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, अमेरिकेच्या विमानामधून खाली पडून राष्ट्रीय फुटबॉलपटू झाकी अनवारी (Afghan Footballer Zaki Anwari) याचा मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था ‘एरियाना’नं यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एरियानानं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील विमान बोइंग सी-17 मधून पडून राष्ट्रीय फूटबॉलपटूचा मृत्यू झाला आहे. काबुल एअरपोर्टवर अमेरिकेतील विमानातून पडून झाकी अनवारीचा (Zaki Anwari) मृत्यू झाला आहे.झारीचा मृत्यू सोमवारी 16 ऑगस्ट रोजी विमानातून कोसळून झाला. अमेरिकेतील सैन्याच्या विमानातून खाली कोसळला होता.विमानतळावरील परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून वैमानिकनं लवकर उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here