TauktaeCyclone : रायगडमध्ये तिघांचा मृत्यू

0
126

तौक्ते चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे.रायगड जिल्ह्यात  23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील 1 हजार 886 घरांचे अंशत: नुकसान तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे.आतापर्यंत तिथे तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी आहेत. या चक्रीवादळाचा फटका प्राण्यांनाही बसला असून २ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने ही माहिती जाहीर

सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी घरांच्या छपरांचे, शेडचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून कोसळली आहे.जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण 69 कोविड रुग्णालयांपैकी 31 रुग्णालये थेट वीजपुरवठ्याद्वारे सुरु असून 38 कोविड रुग्णालये जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

या वादळात महावितरणच्या एकूण 65 HT पोलचे, 249 LT पोलचे तर एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळ रायगडातून पुढे सरकले असल तरी वादळी वार्‍यासह पाऊस सुरुच आहे. त्यामुळे रायगडकर चिंतेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here