ToukteCyclone:मुंबईत तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत

0
115

मुंबई व शेजारील ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. रात्रीपासूनच मुंबईत जोराचा वारा वाहत होता. चक्रीवादळ जसजसे मुंबईच्या जवळ येत होते, तसतसा वाऱ्याचा वेग व पावसाचा जोर वाढत गेला. दुपारपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी १२० की.मी. पर्यंत पोहचला होता.या वादळाचा मार्ग अरबी समुद्रात मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावर होता.

वादळी वाऱ्यांमुळे मुंबई शहरात व उपनगरात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहनांचे तर नुकसान झालेच, पण रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर वाढल्याने मंत्रालयासह दक्षिण मुंबईतील सखल भागात, तसेच दादर, हिंदमाता, मिलन सबवे, वांद्रे, सायन, कुर्ला, अंधेरी, कांदिवली भागात पाणी साचले होते. वादळी वारे व तुफानी पावसामुळे सकाळी ११ वाजल्यापासून वांद्रे-वरळी सी-लिंक वरील वाहतूक बसह करण्यात आली होती. मुंबई विमानतळही बंद करून बाहेरून येणारी विमानं अन्य शहरांकडे वळवण्यात आली होती.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स व अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर्सचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून कोविड सेंटरमधील रुग्णांना कालच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यामुळे अनर्थ टळला, केविड सेंटरचा काही भाग वादळी वाऱ्यामुळे उखडला गेला आहे. काही भागाचे छप्पर उडाले आहे.

चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर, नाशिक आदी जिल्ह्यातही वादळी वारे व पावसाचा तडाखा बसला आहे. पर्यटन मंत्री व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे ही मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुमममधून स्थितीवर नजर ठेवून होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here