TVS मोटर पॅव्हेलियनला पंतप्रधान उपस्थित, भविष्यातील मोबिलिटीमध्ये कंपनीची जागतिक आघाडी दर्शवली

0
52
TVS मोटर पॅव्हेलियन,
TVS मोटर पॅव्हेलियनला पंतप्रधान उपस्थित, भविष्यातील मोबिलिटीमध्ये कंपनीची जागतिक आघाडी दर्शवली

·         भारतात ईव्ही मोटर, बॅटरी, बीएमएस, इन्फोटेनमेंट आणि व्हीसीयू डिझाइन, विकसित आणि निर्मितीसाठी फक्त OEM: एंड-टू-एंड ईव्ही तंत्रज्ञान

·         कंपनीने भविष्यातील तंत्रज्ञान, उत्पादने आणि डिजिटल क्षमतांसाठी INR 5,000 कोटी गुंतवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी, 2024: भारतातील एक अग्रगण्य जागतिक वाहन निर्माता TVS मोटर कंपनी (TVSM) – दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या क्षेत्रात ही कंपनी आघाडीवर आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये जागतिक मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी भारतात बनवलेले संच माननीय पंतप्रधानांसमोर प्रदर्शित केले. कंपनी जवळपास 1 अब्ज डॉलरपर्यंत निर्यात करते. हे त्यांच्या वार्षिक उत्पादनाच्या 30% आहे. तर 80 देशांमध्ये तिची उपस्थिती आहे – ही भारताच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या पराक्रमाचा पुरावा आहे, आत्मनिर्भर भारताचा उत्सव आहे. स्वच्छ, कनेक्टेड आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत मोबिलिटी सोल्यूशन्सवर कंपनीने लक्ष केंद्रित केल्याने आत्मनिर्भर भारतला आणखी समर्थन मिळेल आणि पुढील काही वर्षांत त्याचा निर्यातीचा वाटा 50% वर जाईल.

TVS मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांनी पंतप्रधानांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भारताला सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भविष्यातील तंत्रज्ञान, उत्पादने आणि डिजिटल क्षमतांचे डिझाइन, विकास आणि उपयोजन यासाठी INR 5,000 कोटी (USD 600 MN) ची गुंतवणूक करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. TVSM हे भारतातील एकमेव OEM आहे ज्यामध्ये एंड-टू-एंड इनहाऊस ईव्ही आणि बॅटरी उत्पादन, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली, वाहन नियंत्रण युनिट आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसह कनेक्ट केलेल्या क्षमता आहेत. मटेरियल सायन्स, इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आणि डेटा सायन्स यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर 2,000+ अभियंते काम करतात. त्यात 650 हून अधिक EV संबंधित पेटंट आहेत. अत्याधुनिक स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये हे उद्योग अग्रेसर आहे. कंपनीने अलीकडेच TVS X लाँच केले – जगातील सर्वात प्रगत कनेक्टेड, इलेक्ट्रिक स्कूटर ही तिच्या संशोधन आणि अभियांत्रिकी क्षमतेचे एक प्रात्यक्षिक आहे. TVS iQube – त्याच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटरचे आधीच 250,000 ग्राहक आहेत.

एक्स्पोमध्ये एक दिवस घालवणारे सुदर्शन वेणू यावेळी म्हणाले, “आमच्या कंपनीच्या वाटचाल तसेच प्रगतीची पंतप्रधान दखल घेत असून यामुळे आम्ही सन्मानित आहोत. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकामुळे आम्ही खूप उत्साही आहोत. पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे आणि सरकारने निर्माण केलेल्या सहाय्यक धोरण वातावरणामुळे, भारत सध्या नावीन्याचे केंद्र आणि जागतिक उत्पादनकर्ता बनला आहे. या प्रवासात आपली भूमिका बजावण्यासाठी टीव्हीएस मोटर उत्सुक आहे. अभियांत्रिकी तसेच संशोधन आणि विकास हे आमचे मूळ आहे. आणि आमचे 2,000+ अभियंते यात उत्कृष्ट योगदान देतात. आमच्या ग्राहकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे, तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी आणि अत्याधुनिक डिझाइनसह भविष्य पुन्हा परिभाषित करणे हे आमचे ध्येय आहे.”

भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये TVSM ने प्रथमच नॉर्टन मोटरसायकल प्रदर्शनात ठेवली आहे. नॉर्टन हा 125 वर्षांचा जुना मोटरसायकल ब्रँड आहे, जो TVS मोटरने विकत घेतला आहे आणि जागतिक स्तरावर पुन्हा येण्यासाठी त्याला सज्ज केले जात आहे. जागतिक कौशल्य आणि नवीन उत्पादनांच्या श्रेणीमध्ये कंपनी सध्या गुंतवणूक करत आहे, जी 2025 पर्यंत तयार होतील. https://sindhudurgsamachar.in/भारतात-ॲब्रोसिटिनिब/

या कार्यक्रमाला भेट देण्याऱ्या पाहुण्यांना कंपनीच्या इतर उत्पादने, कारखाना तसेच आणि बाहेर महिला आणि तरुणांना सक्षम बनविण्यावर त्यांचा भर, कंपनीचा जागतिक दृष्टीकोन आणि सामुदायिक काम पाहण्याची संधी मिळाली. ऑटोमोटिव्ह कंपनी कॅम्पसमधील जगातील पहिल्या आणि एकमेव बायो-रिझर्व्हमधील वनस्पती आणि प्राण्यांचे फुटेज पाहण्याची संधी हे येथील प्रमुख आकर्षण आहे. TVS रेसिंग टीमची सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची महिला बाईकर ऐश्वर्या पिसे यांनाही भेटण्याची संधी इथे भेट देणाऱ्यांना मिळू शकते.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2024 मधील उपलब्ध कंपनीच्या उत्पादनांचे तपशील

1.    TVS X – जगातील सर्वात प्रगत कनेक्टेड, इलेक्ट्रिक स्कूटर. ही भारतात बनवली गेल्याचा सार्थ अभिमान आहे. ही स्कुटर जागतिक इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडस्ट्रीमध्ये एक नवीन बेंचमार्क प्रस्थापित करते. या स्कुटरचे अप्रतिम डिझाइन, उच्च क्षमता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये एक नवीन श्रेणी तयार केली आहे.

2.    TVS iQube – TVSM ची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक टू-व्हीलर, 2020 मध्ये लॉन्च झाली. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात EV मोबिलिटीला सुरुवात झाली.

3.    मूल्य निर्मितीमध्ये महिलांचा सहभाग – EV बॅटरी असेंब्ली लाईन्स ज्या टीमच्या नेतृत्वाखाली 65% महिला आहेत, R&D मध्ये 150+ महिला अभियंता आहेत. यासोबतच पहिल्या आणि एकमेव महिला फॅक्टरी रेसिंग टीमसह महिला रेसिंगमध्ये अग्रणी आहेत.

4.    TVS Apache 310 मालिका – BMW सह सहजीवन भागीदारीचा परिणाम, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा पुरावा आहे. 

5.    नॉर्टन मोटारसायकल्स – एक प्रतिष्ठित ब्रँड जो तामिळनाडूच्या होसूर येथे स्थापन केलेल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विकास केंद्रासह जागतिक पातळीवर पुन्हा उतरण्यासाठी बदलला जात आहे.

6.    TVS कनेक्टेड सर्व्हिसेस – स्मार्ट घड्याळ, मोबाइल फोन, वाहन अशा अनेक आधुनिक गोष्टींचा अनुभव देत दैनंदिन प्रवास अधिक सुखकर करतात.

7.    शाश्वत उत्पादन पद्धती – 88% ऊर्जा गरजा अक्षय स्रोत, 8 मेगावॅट सौर ऊर्जा, 35 मेगावॅट पवन ऊर्जा, 22 एमएन लीटर पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता याद्वारे पूर्ण केल्या जातात.

8.    श्रीनिवासन सर्व्हिस ट्रस्टचा सामाजिक उपक्रम – आतापर्यंत त्यांनी 2,500 गावांमध्ये 1.6 मिलियन लोकांना सेवा दिली आहे.

9.    ईजीओ मूव्हमेंटमधील ई-बाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here