वेंगुर्ला प्रतिनिधी- भारतीय संविधानाचा आदर करणे आणि त्यानुसार आचरण करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रा.वामन गावडे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-तुळस आणि बॅ. खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त ‘संविधान जाणून घ्या, नागरिक जागरूकता‘ कार्यक्रमाचे उद्घाटन बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रा.आनंद बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रा.वामन गावडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.एस.टी.भेंडवडे, वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा.सचिन परुळकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, कांदळवन प्रतिष्ठानचे गुरुदास तिरोडकर, डॉ.प्रा.एम.बी.चौगले, डॉ.प्रा.वसंतराव पाटोळे, प्रा.एम.आर.नवत्रे, प्रा.एस.जी. चुकेवाड, प्रा.डी.आर.आरोलकर, प्रा.एल.बी.नैताम, संजय पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित युवक युवतींना संविधानाविषयी शपथ देण्यात येऊन संविधान विषयक आदर व पालन करण्याबाबत संकल्प करण्यात आला. प्रा.गावडे यांनी भारतीय संविधानानुसार भारतीय सार्वभौमत्व संरक्षण, सर्वधर्म समभाव, राष्ट्रप्रेम याबाबत मार्गदर्शन केले. तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा.आनंद बांदेकर यांनी सुजाण नागरिक म्हणून आपले हक्क आणि आपली कर्तव्य जाणून त्याचे पालन करणे, राष्ट्रप्रेम, स्त्रियांचा आदर, सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संविधानाची जाणिव जागृती करून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवा असे आवाहन उपस्थित युवकांना केले. सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर यांनी तर आभार प्रा.नंदगिरकर यांनी मानले.
फोटोओळी – बॅ.खर्डेकर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रा.वामन गावडे यांनी मार्गदर्शन केले.


[…] […]