Vengurla: ‘गणित मुलभूत कौशल्ये‘ पुस्तकाचे प्रकाशन

4
333

वेंगुर्ला प्रतिनिधी- गणित विषयाचे प्रसिद्ध तज्ज्ञ शिक्षक व आसोली हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांनी लिहिलेल्या गणित मुलभूत कौशल्ये‘ या गणित विषयक पुस्तकाचे प्रकाशन १९ ऑक्टोबर रोजी आसोली हायस्कूल येथे झाले. यावेळी व्यासपिठावर माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकरउद्योजक पुष्कराज कोलेआसोली ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष विष्णू उदय धुरीमुख्याध्यापक विष्णू रेडकरशिक्षिका भावना आवळेमाजी शिक्षक सुरेश शिरोडकरमाजी मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकरसुरेश धुरीविजय धुरीझिलू घाडीवर्षा किनळेकररेश्मा पिगुळकरएकनाथ पिगुळकर आदी उपस्थित होते.

या पुस्तकात सुमारे ३७ स्वाध्याय असून गृहपाठ म्हणून विद्यार्थ्यांना सोडवायला तसेच आठवीपर्यंत शिकणा-या विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास म्हणून वापरता येणार आहेत. संख्यावरील मुलभूत क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार अपूर्णांक, दशमान अपूर्णांक क्रियांचा क्रम, घातांक, असमानता, मसावि-लसावि, बैजिक राशी, दैनंदिन जीवनातील निगडीत घटक आणि महत्त्वपूर्ण उपयुक्त गणितातील उच्चस्तरीय गणिती पाया या पुस्तकात अंतर्भूत केला आहे.

फोटोओळी – गणित मुलभूत कौशल्ये‘ या गणित विषयक पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

4 COMMENTS

  1. […] प्राचीन काळी मंदिरांमध्ये देवतांसमोर कलाकारांनी कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येत असे आणि त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती. मंदिरांमध्ये सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देऊ शकते, असा संशोधनाद्वारे काढण्यात आलेला निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी मांडला. http://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/ […]

  2. […] पुणे: अखिल भारतीय इतिहास परिषद महाराष्ट्र राज्यच्या हवेली तालुका पुणे कार्याध्यक्ष म्हणून श्री. विलास कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दलचे पत्र श्री. संतोष झिपरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात त्यांना आले. http://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/ […]

  3. […] पुणे- तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्तनोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेक गैरप्रकार पुढे आल्यानंतर जमिनीच्या एक-दोन गुंठे खरेदी-विक्री व्यवहारांची दस्तनोंदणी करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच, अशा प्रकारच्या जमिनींची खरेदी-विक्री करायची असल्यास संबंधित लेआऊट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यावर दाखल पुनराविलोकन याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून होणार्‍या दस्तनोंदणीला तूर्त स्थगिती दिली आहे.पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला होणार आहे. http://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/ […]

  4. […] दीपावली शो टाईम अंतर्गत आयोजित केलेल्या या खेळ पैठणीमध्ये एकूण ३५ महिलांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा आनंद लुटला. यात प्रगती प्रसाद गावडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना वक्रतुंड ज्वेलर्सचे रामचंद्र मालवणकर यांनी पुरस्कृत केलेली सोन्याची नथ व  चिन्मय ज्वेलर्सचे दिलीप तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेले चांदीचे नाणे देण्यात आले. प्रतिक्षा प्रशांत सावंत यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना दुर्वांकूर ज्वेलर्सचे बंड्या तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेली चांदीचे निरांजन आणि चिन्मय ज्वेलर्सचे दिलीप तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेले चांदीचे नाणे देण्यात आले. तर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त दिक्षा दिपक राणे यांना चिन्मय ज्वेलर्सचे दिलीप तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेले चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले. तसेच आनंद कळेकर यांच्याकडून स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना तेलपिशवी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोवेकर व नागेश नेमळेकर यांनी केले. http://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here