Vengurla: जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत दूर्वा, दिक्षा व नेहा यांचे यश

0
37

वेंगुर्ला प्रतिनिधी- हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात दूर्वा पावसकर, मोठ्या गटात दिक्षा नाईक तर खुल्या गटात नेहा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविले. https://sindhudurgsamachar.in/vengurla-वेंगुर्ला-ते-पंढरपूर-पा/

येथील हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळाच्यावतीने २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत दिपावली शो टाईमचे आयोजन केले होते.  दि.२५ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात दुर्वा पावसकर (प्रथम), काव्या गावडे (द्वितीय), आरव आईर (तृतीय), आरुषी मांजरेकर (उत्तेजनार्थ), मोठ्या गटात दिक्षा नाईक (प्रथम), सोहम जांभोरे (द्वितीय), नंदिनी बिले (तृतीय), तन्मय आईर (उत्तेजनार्थ) तर खुल्या गटात नेहा जाधव (प्रथम), समर्थ गवंडी (द्वितीय), पूजा राणे (तृतीय) व ईशा गोडकर (उत्तेजनार्थ) यांनी क्रमांक पटकाविले.https://sindhudurgsamachar.in/vengurla-वांद्रेश्वर-व-धोकमेश्व/

स्पर्धेचे परिक्षण रेश्मा वरसकर, शेजल गावडे, रामा पोळजी, भक्ती जामसंडेकर व प्रणाली कासले यांनी केले. तर सूत्रसंचालन नागेश नेमळेकर व योगेश गोवेकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/

फोटोओळी – जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here