विजेत्यांवर भरघोस बक्षिसांची बरसात
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत सेजल सोपान गवंडे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यांना पॉप्युलर क्लॉथ सेंटरचे अमर दाभोलकर यांनी पुरस्कृत केलेली मानाची पैठणी, आरिफ ऑटो गॅरेजचे आसिफ खान यांनी पुरस्कृत केलेली चांदीची अंगठी व रोख रक्कम, गुरुप्रसाद ज्वेलर्स यांनी पुरस्कृत केलेली चांदीची अंगठी, चिन्मय ज्वेलर्सचे दिलीप तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेले चांदीचे नाणे अशी भरघोस बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तर प्रथम क्रमांक प्राप्त सेजल गवंडे यांच्या पतीच्या टु-व्हीलर गाडीला एस.जे.सर्व्हीस सेंटरचे जयंत बोवलेकर हे टेफ्लॉन कोटींग करुन देणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जमिनीच्या-एक-दोन-गुंठे-ख/
दीपावली शो टाईम अंतर्गत आयोजित केलेल्या या खेळ पैठणीमध्ये एकूण ३५ महिलांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा आनंद लुटला. यात प्रगती प्रसाद गावडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यांना वक्रतुंड ज्वेलर्सचे रामचंद्र मालवणकर यांनी पुरस्कृत केलेली सोन्याची नथ व चिन्मय ज्वेलर्सचे दिलीप तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेले चांदीचे नाणे देण्यात आले. प्रतिक्षा प्रशांत सावंत यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना दुर्वांकूर ज्वेलर्सचे बंड्या तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेली चांदीचे निरांजन आणि चिन्मय ज्वेलर्सचे दिलीप तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेले चांदीचे नाणे देण्यात आले. तर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त दिक्षा दिपक राणे यांना चिन्मय ज्वेलर्सचे दिलीप तुळसुलकर यांनी पुरस्कृत केलेले चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले. तसेच आनंद कळेकर यांच्याकडून स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना तेलपिशवी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोवेकर व नागेश नेमळेकर यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/
फोटोओळी – होम मिनिस्टर स्पर्धेतील पैठणीच्या मानकरी ठरलेल्या सेजल गवंडे यांना त्यांच्या पतीने उचलून घेत आनंद साजरा केला.

