Vengurla: धान्य वितरणास मुदतवाढ देण्याची मागणी

0
33

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे पॉज मशिन चालत नसल्याने नागरिकांना धान्य मिळणे कठीण झाले आहे. रास्त दराच्या धान्य दुकानांवर फे-या मारुन गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे. ३१ नोव्हेंबर या शेवटच्या तारखेपर्यंत अजूनही ६० टक्के लोकांना धान्य मिळाले नसल्याने धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी अशाप्रकारची मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने वेंगुर्ला तहसिलदार यांच्याकडे केली आहे.

 भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने वेंगुर्ला वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयामध्ये भेट देत नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, तालुका उपाध्यक्ष दीपक नाईक, विश्वनाथ परब, गोविद परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धान्य वितरणावेळी पॉज मशिनची येणारी अडचण याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी दौ-यात पालकमंत्री रविद्र चव्हाण यांची भेट घेऊन धान्य वितरणावेळी येणा-या अडचणींवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी भाजपातर्फे पाठपुरवा केला जाणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

फोटोओळी – धान्य वितरणास मुदतवाढ मिळण्याबाबत भाजपाने तहसिलदार यांना दिलेले निवेदन नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी स्वीकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here