वेंगुर्ला प्रतिनिधी- येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.वामन गावडे व संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रा.आनंद बांदेकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी विरेंद्र देसाई, संजय पाटील, विधाता सावंत, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
फटोओळी – प्रा.वामन गावडे व सुरेंद्र चव्हाण यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

