Vengurla: वेंगुर्ला आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी बसेस रवाना

3
275

वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकोकण प्रदेश सिंधुदुर्ग विभाग वेंगुर्ला आगारामार्फत २६ ते २९ ऑक्टोबर अशा चार दिवसांच्या अष्टविनायक दर्शनासाठी खास एकाचवेळी चार विठाई‘ बसेस सोडण्यात आल्या. या यात्रेचा शुभारंभ वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या यात्रेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

अष्टविनायक यात्रेसाठी प्रवासी वर्गातून मागणी होती त्यानुसार ही यात्रा आयोजित केली आहे. यापुढेही प्रवासी उपलब्ध झाल्यास बसेस सोडल्या जातील अशी माहिती वेंगुर्ला आगार व्यवस्थापक शेवाळे यांनी दिली. यावेळी वाहतूक निरीक्षक निलेश वारंग, निरीक्षक एल.डी.पवार, मकरंद होळकर, पपू तामणेकर, राहुल आरोलकर, श्री. येसाजी, गुरू गावडे, नंदू दाभोलकर, आशिष खोबरेकर, विठ्ठल जाधव यांच्यासह आगारातील क्लार्क, वाहतूक नियंत्रक, महिला कर्मचारी, चालक, वाहक आदी उपस्थित होते.

या यात्रेसाठी एकूण चार विठाई बससहीत एन.आर.होळकर, जी.आर.गावडे, आर.वाय.आरोलकर, ए.के.येसाजी, एस.आर.तामणेकर, वाय.डी.खानोलकर, वाय.एस.बोवलेकर, आर.पी.पालकर असे ८ चालक व नंदू दाभोलकर, गौरेश राणे, अंकुश केरकर, बाळू नाईक हे ४ सहकारी गेले आहेत. प्रवाशांसाठी जेवणाच्या साहित्य व जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निरीक्षक निलेश वारंग यांनी दिली आहे.

फोटोओळी – अष्टविनायक दर्शनासाठी खास एकाचवेळी चार विठाई‘ बसेस वेंगुर्ल्यातून सोडण्यात आल्या.