Vengurla: वेंगुर्ला ते पंढरपूर पायी वारीचे प्रस्थान

1
189
कार्तिक महाएकादशीसाठी वेंगुर्ला ते पंढरपूर अशा पायी वारीचे प्रस्थान झाले आहे.

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे निघणा-या पायी वारीचे प्रस्थान बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी झाले. वेंगुर्ला बाजारपेठेतून निघालेली ही पायी वारी पहिल्या दिवशी दुपारी बिपिन वरसकर यांच्या घरी तर रात्रौ मठ येथील सुरेश नाईक यांच्या घरी मुक्कामास राहिली.

या पायी वारीत बहुसंख्य महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले आहेत. हरिनामाचा गजर करीत प्रस्थान केलेल्या या वारीचे मार्गात ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत होत आहे. दि.२७ रोजी सकाळी कै.चंदुशेठ आसोलकर बाग कामळेवीर, रात्री बबन नाईक, कोलगाव यांच्या घरी मुक्काम झाल्यानंतर दि. २८ रोजी सकाळी साटम महाराज आश्रम, रात्री आंबोली, २९ रोजी दुपारी आजरा व रात्री निपाणी, ३० रोजी दुपारी नरसिहवाडी, रात्री मिरज, ३१ रोजी दुपारी नागज, रात्री सांगोला, १ नोव्हेंबर रोजी दुपारी मठ वस्ती व रात्री पंढरपूर येथे पोहचणार आहेत. दि.२ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत या वारीचा पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे.https://sindhudurgsamachar.in/vengurla-वेंगुर्ला-आगारातून-अष्/

फोटोओळी – कार्तिक महाएकादशीसाठी वेंगुर्ला ते पंढरपूर अशा पायी वारीचे प्रस्थान झाले आहे.

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- हॉस्पिटल नाका कला-क्रिडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात दूर्वा पावसकर, मोठ्या गटात दिक्षा नाईक तर खुल्या गटात नेहा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविले. http://sindhudurgsamachar.in/vengurla-वेंगुर्ला-ते-पंढरपूर-प… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here