समाजातील अनिष्ट गोष्टी विषयी आवाज उठवण्यासाठी कटिबद्ध व्हा – विश्वनाथ कांबळी
वेंगुर्ला प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने सतर्कता दिन उद्बोधन वर्ग घेण्यात आला. समाजातील ढासळती परिस्थितीचे अवलोकन युवा वर्गाला करून देण्याच्या मुख्य उद्देशाने सतर्कता दिन उद्बोधन वर्ग घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला बाल विकास विभाग सिंधुदुर्गचे जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी विश्वनाथ कांबळी यांच्या हस्ते झाले.
यावेळी बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या सविता कांबळी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ, कांदळवन प्रतिष्ठानचे गुरुदास तिरोडकर, किरण राऊळ आदी उपस्थित होते.
महिला आणि बालक यांच्या विविध योजना विषयी माहिती युवा वर्गाला करून देताना समाजातील अनिष्ट गोष्टी विषयी आवाज उठवण्यासाठी कटिबद्ध व्हा असे आवाहन विश्वनाथ कांबळी यांनी केले. तर सविता कांबळी यांनी बाललैंगिक शोषण, महिला अत्याचार याविषयी माहिती दिली. यावेळी बहुसंख्य युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया वराडकर तर आभार जान्हवी सावंत यांनी मानले.


