वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे कोकण विभाग सहसंयोजक शशिकांत शरद पेंडसे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. सिधुदुर्गात लवकरच भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने दशावतार नाट्य महोत्सव आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, तालुका उपाध्यक्ष दिपक नाईक, शक्तीकेंद्र प्रमुख संतोष शेटकर, महेश सावंत, विश्वनाथ परब, गोविद परब, वासुदेव पांगम आदी उपस्थित होते.
फोटोओळी – भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे कोकण विभाग सहसंयोजक शशिकांत शरद पेंडसे यांचे वेंगुर्ला भाजपा कार्यालयात स्वागत करण्यात आले.

