WHO ने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन संबंधित आणखी माहिती मागितली

0
108

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन संबंधित आणखी माहिती मागितली आहे. एनडीटीव्हीच्या  माहितीप्रमाणे WHOने भारतीय कंपनी बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची काही तांत्रिक माहिती मागितली आहे. भारत बायोटेकने इमरजेंसी यूज ऑथराइजेशन (EUA) साठी WHO ला आधीच कोव्हॅक्सिन संबंधित सर्व डेटा दिलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी कोव्हॅक्सिनच्या मंजुरीसाठी कागदपत्रे सादर केले असून आपत्कालीन वापरासाठी कोव्हॅक्सिनला लवकरच WHO ची मान्यता मिळेल.’ अशी माहिती गेल्या शुक्रवारी दिली होती. यापूर्वी नॅशनल एक्सपर्ट ग्रुपचे डॉ. व्ही के पॉल यांनीही म्हटले होते की, कोव्हॅक्सिनसाठी WHO ची मंजूरी या महिन्याच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

ब्रिटन सरकारने 18 सप्टेंबर रोजी एक नियम जारी केला आहे .यामध्ये जर तुम्ही आफ्रिका, दक्षिण अमेरिका किंवा संयुक्त अरब अमीरात, भारत, तुर्की, जॉर्डन, थायलंड आणि रशियामध्ये कोरोनाचे लसीकरण केले असेल तर तुम्हाला यूकेमध्ये अनव्हॅक्सिनेटेड मानले जाईल.तसेच कोविडशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा भारतीयांना यूकेमध्ये आल्यावर 10 दिवसांसाठी क्वारंटाइन करणे आवश्यकअसून त्यांना चाचण्या देखील कराव्या लागतील असा नवा निर्बध घातला आहे.त्यामुळे येथील भारतीय नागरिकांनी ब्रिटनच्या या निर्णयाचे वर्णन वांशिक भेद असे केले आहे. ते भारताच्या लसीच्या प्रमाणपत्रावर विश्वास ठेवू शकत नाहीत.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देखील 2 ते 12 वर्षांच्या मुलांवर कोवावॅक्सच्या दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here