ब्रिटीश अब्जाधीश आणि व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी रविवारी अंतराळातील ऐतिहासिक उड्डाण सुरू केले.यांनी रविवारी इतिहास रचला. ते व्हर्जिन गॅलॅक्टिक रॉकेट विमानात 60 मिनिटांची अंतराळ यात्रा करुन परतले. लँडिंग करताच त्यांनी आपला अनुभव संस्मरणीय असल्याचे म्हटले आहे.
व्हर्जिन गॅलॅक्टिकचे पॅसेंजर रॉकेट विमान व्हीएसएस युनिटीमध्ये रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासह भारताची सिरीशा बांदल आणि आणखी 5 लोकांचा समावेश होता.पुढच्या वर्षी कॉमर्शियल टूर सुरू करण्यापूर्वी रिचर्ड ब्रॅन्सन स्वतः याचा अनुभव घेऊ इच्छित होते. जर हे उड्डाण यशस्वी झाले तर त्यांची कंपनी व्हर्जिन अंतराळातील व्यावसायिक दौरा सुरू करण्याच्या दिशेने सर्वात मोठे पाऊल उचलत आहे. या मोहिमेनंतर सिरिशा कल्पना चावलानंतर अवकाशात गेलेली दुसरी भारतीय वंशाची महिला बनली आहे. पॅसेंजर रॉकेटमधून ब्रॅन्सन अंतराच्या काठापर्यंत गेले आणि तिथे त्यांनी वजनहीनपणाचा अनोखा अनुभव घेतला.