अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा अखेर रद्द

0
132

इयत्ता 11 वीत प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.उच्च न्यायालयाने इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही. अशाप्रकारचा निर्णय दिलेला आहे. येत्या सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले आहेत.

इयत्ता 11 वीत प्रवेश देण्यासाठी सीईटी घेण्यापेक्षा इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारावरच प्रवेश द्या असे सक्त निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

या सीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून 11 लाख विद्यार्थांनी अर्ज केले होते. यामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) आदी मंडळांच्या 36 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती.राज्य सरकारने 11 वी प्रवेशासाठी सीईटी घेण्यासंदर्भांत 25 मे रोजी अध्यादेश काढला होता. मुंबई उच्च न्यायालयाने याच अध्यादेशाला रद्द केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here