टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत अंकितांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वी अंकितानं आपल्या खास मित्रांना बॅचलर पार्टी दिली होती. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
अंकितानं कालच एकता कपूरला लग्न पत्रिका देत विवाहाचं निमंत्रण दिलं. त्यानंतर एकता आणि अंकिता घराबाहेर आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामननी अंकिताला घेरलं. अंकिता खूप खूश दिसत होती.अंकिता आणि विक्कीच्या लग्नाची पत्रिका ब्लू कलरमध्ये आहे. त्यावर सिल्व्हर रंगात अंकिता आणि विकास अस लिहिलेलं आहे.