बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. या दोघीही कोरोनाच्या सुपर स्प्रेडर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण या दोघींनीही गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. मात्र मुंबईतील पार्ट्यांमध्ये सहभागी होत असताना या दोघींनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहिती आहे.
महानगरपालिकेने करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांना RTPCT चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे अहवाल आज येऊ शकतात. दोघींच्याही प्रकृतीविषयीचे अपडेट अद्याप समोर आलेले नाहीत.